Ashok Leyland Electric Truck : Ashok Leyland ने डिलिव्हर केला पहिला Electric Truck

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ashok Leyland Electric Truck : देशात गेल्या वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीकडे ग्राहकांची मागणी वाढत आहे. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपण्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदुजा समुहाची प्रमुख कंपनी Ashok Leyland ने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (Bharat Mobility Global Expo) मध्ये आपला पहिला वाहिला इलेक्ट्रिक ट्र्क डिलिव्हर केला आहे. अशोक लेलँडने बिलियन ई-मोबिलिटीला 14T बॉस इलेक्ट्रिक ट्रकच्या चाव्या दिल्या. 14T Boss Electric Truck असे या ट्र्कचे नाव असून अशोक लेलँडने गेल्या वर्षीच्या ऑटो एक्सपोमध्ये हा ट्रक पहिल्यांदा सर्वांसमोर आणला होता. आता त्याची पहिली डिलिव्हरी करण्यात आली.

पर्यावरणपूरक वाहतुकीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा- Ashok Leyland Electric Truck

यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शेनू अग्रवाल यांनी एका निवेदनात सांगितले, “अशोक लेलँडला आज त्यांच्या ग्राहकांना पहिला फुल्ल इलेक्ट्रिक वाहन देण्याचा अभिमान वाटतो. गेल्या वर्षी ऑटो शोमध्ये Boss 14T इलेक्ट्रिक ट्रक सादर करण्यात आला होता. ग्रीन मोबिलिटीसाठी आपण कटिबद्ध असून आज या ट्र्कची डिलिव्हरी हा आमच्या पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम वाहतुकीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जस जस जग आणि देश विकसित होत आहे तस तस आम्ही सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा पुरवण्यास सज्ज आहोत असेही त्यांनी म्हंटल.

तर दुसरीकडे, बिलियन ई-मोबिलिटी अँड चार्ज या वितरण कंपनीचे संस्थापक कार्तिक हरियानी यांनी म्हंटल कि, तांत्रिकदृष्ट्या अपडेटेड आणि प्रगतशील असा 14T बॉस इलेक्ट्रिक ट्रक (Ashok Leyland Electric Truck) देशाच्या व्यावसायिक गरजांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि विकासाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल. हा इलेक्ट्रिक ट्रक पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी योग्य आहे. अशोक लेलँडला व्यावसायिक वाहन उद्योगात 75 वर्षांचा अनुभव असून कंपनी आपल्या नवनवीन आयडिया वापरून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच सर्व शक्य पावले उचलते असा भावना व्यक्त करत त्यांनी अशोक लेलँडचे आभार मानले