कृष्णा कृषी विकास परिषदेच्या अध्यक्षपदी अशोकराव थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आपला देश कृषीप्रधान असून अर्थव्यवस्थेचा स्थिरपणा हा शेतीमुळे आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढविणे, पाण्याचे नियोजन करणे यासह अॅग्रीकल्चरमध्ये टेक्नालाॅजी आणली पाहिजे यासाठी कृष्णा कृषी विकास परिषद व पाणी परिषदेचे स्थापना करण्यात आल्याची माहिती यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुरेश भोसले यांनी केली.

कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी कृष्णा कृषी विकास परिषदेच्या अध्यक्षपदी शेतीमित्र अशोकराव थोरात यांची निवड करण्यात आली. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, शेतीमित्र अशोकराव थोरात, संचालक जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, संजय पाटील, निवासराव थोरात, वसंतराव शिंदे, संभाजीराव पाटील, विलास भंडारे, सयाजी यादव, जे. डी. मोरे, शिवाजी पाटील, बाबासो शिंदे, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले आदी उपस्थित होते.

डाॅ. सुरेश भोसले म्हणाले, इस्त्रालय येथे नो टच पध्दतीने शेती केली जाते. तेथे मोठ्या प्रमाणावर टेक्नालाॅजीचा वापर केला जातो. अनेक देशात 15 ते 20 प्रकारची साखर तयार होते. मात्र, आपल्याकडे केवळ एक प्रकारची साखर तयार होते. त्यामुळे आता साखर कमी करून इथेनाॅळ निर्मिती वाढवावी लागेल. शेतीत रिसर्च होत नाही, संशोधन व्हावे, शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढावे. यासाठीच आम्ही कृष्णा कृषी परिषदेची स्थापना करीत आहोत.

कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी अशोकराव थोरात

कृष्णा कृषी परिषदेत 21 संचालक नियुक्त केले जाणार आहेत. या परिषदेच्या अध्यक्षपदी पाच वर्षासाठी अशोकराव थोरात यांची निवड करण्यात आली आहे. पुढील 20 संचालकांची नेमणूक ही शेती तज्ञ अशा लोकांची केली जाणार आहे. या परिषदेतून शेतकरी व शेती यांना मुख्य बिंदू मानून काम केले जाईल.

Leave a Comment