Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra : IRCTC कडून अष्ट ज्योतिर्लिंगाची विशेष यात्रा; खर्च किती?

Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra । श्रावण महिन्यात अष्ट ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने अष्ट ज्योतिर्लिंगाची विशेष यात्रा जाहीर केली आहे. ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगाव येथून ही यात्रा सुरु होईल. या यात्रेच्या माध्यमातून द्वारका (नागेश्वर), सोमनाथ, उज्जैन (महाकालेश्वर), ओंकारेश्वर, नाशिक (त्र्यंबकेश्वर), औरंगाबाद (गृष्णेश्वर), परभणी (परळी वैजनाथ) आणि मरकापूर (श्रीशैलम मल्लिकार्जुन) अशा धार्मिक स्थळांना तुम्हाला भेटी देता येणार आहेत. या विशेष टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती २३,८८० रुपयांपासून सुरु होते.

IRCTC च्या पश्चिम क्षेत्र मुंबई कार्यालयाने आयोजित केलेली ही यात्रा (Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra) भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून पूर्ण होईल. श्रावण सारख्या पवित्र महिन्यात आयोजित करण्यात आलेली हि यात्रा भक्तांना परवडणारा आणि संस्मरणीय प्रवासाचा आनंद देईल. पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले, “आमचे उद्दिष्ट कुटुंबे, गट आणि एकट्या प्रवाशांसाठी धार्मिक पर्यटन सोपे आणि अधिक आनंददायी बनवणे आहे. या यात्रेबद्दल भक्तांच्या मनात आधीच मोठी उत्सुकता आहे आणि नियमित प्रवासी हे पॅकेज त्वरित ऑनलाइन बुक करत आहेत.

कशी असेल ट्रेन ?

भारत गौरव पर्यटन ट्रेनमध्ये स्लीपर (नॉन-एसी), एसी III टियर आणि एसी II टियर कोच आहेत. या मधून एकाच वेळी सुमारे ६०० ते ७०० प्रवाशी प्रवास करू शकतात. ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ताजे अन्न देणारी पेंट्री कार असेल. या ट्रेनला भारतीय हेरिटेज दर्जाच्या कलाकृतीने सजवण्यात आलेले आहे. सोलापूर,कुर्डूवाडी, दौंड,पुणे,लोणावळा,कर्जत, कल्याण,वसई रोड, डहाणू रोड, वापी आणि सुरत या स्थानकांवर थांबेल.

किती आहे पॅकेज? Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra

अष्ट ज्योतिर्लिंग विशेष यात्रेच्या पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती २३,८८० रुपयांपासून सुरू होते. तुम्ही www.irctctourism.com या अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करू शकता. या सर्व समावेश पॅकेजमध्ये (Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra) ट्रेनचा प्रवास, हॉटेस स्टे, जेवण, साईट पाहण्यासाठी रस्ता वाहतूकीचा खर्च,टुर गाईड, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि इतर ऑनबोर्ड सोयीसुविधांचा समावेश आहे.