हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ashtavinayak Yatra MSRTC । अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं म्हणजेच ५ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाकडून हि विशेष यात्रा काढण्यात येणार आहे. पुण्यातील शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगार इथून अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत! त्यामुळे अष्टविनायकाचे दर्शन घेणाऱ्या गणेशभक्तांना आरामदायी प्रवासात अष्टविनायकाचे दर्शन घेता येईल.
कसं आहे वेळापत्रक? Ashtavinayak Yatra MSRTC
अष्टविनायक दर्शनासाठी जाणारी ही विशेष बस ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून सुटेल. दोन दिवसांच्या या सहलीमध्ये अष्टविनायकाची आठही मंदिराचे दर्शन भाविकांना घेता येईल. या अष्टविनायक यात्रेदरम्यान, प्रवाशांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय भक्तिनिवासमध्ये करण्यात येईल. कमी वेळेत सुरक्षित दर्शनाची हमी भाविकांना देण्यात येत आहे/
तिकीट किती आहे?
अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या या विशेष बससाठी प्रौढ आणि मुलांकरिता वेगवेगळे तिकीटदर ठेवण्यात आले आहेत. प्रौढांसाठी 1142 ते 1162 रुपये तर लहान मुलांसाठी 574 ते 584 रुपये असा हा प्रवास खर्च असेल. मात्र बाकी नाश्ता आणि जेवणाचा खर्च भाविकांना स्वतःच करावा लागणार आहे. Ashtavinayak Yatra MSRTC
कुठे बुकिंग कराल?
गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी एसटी महामंडळाने ऑनलाइन बुकिंगची सोय केली आहे. तुम्ही www.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महामंडळाच्या मोबाइल अॅपवरून बुकिंग करू शकता. याशिवाय खाजगी अधिकृत बुकिंग केंद्रांवरूनही तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.




