हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेगाच्या बाबतीत वंदे भारत (Vande Bharat) एक्सप्रेसने शताब्दी अन राजधानी एक्सप्रेसलाही मागे टाकले आहे. पण आता याच प्रमुख प्रिमीयम ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसापासून यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. संसदेत काही खासदारांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. सुपरफास्ट रेल्वे म्हणून दावा करण्यात येणाऱ्या ट्रेनचा वेग कमी का? यासाठी सरकारची योजना काय आहे? ट्रेन पूर्ण स्पीडने चालवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत अन कधीपर्यंत त्या पूर्ण होतील, असे प्रश्न विचारण्यात आले आहे. यावर रेल्वेमंत्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे स्पष्टीकरण –
वंदे भारत एक्स्प्रेस 160 किमी प्रति तास वेगाने धावत आहे. पण , या आधी झालेल्या चाचणीत हीच ट्रेन 180 किमी प्रति तास वेगाने धावताना दिसत होती. यावर रेल्वेमंत्रीनी स्पष्टीकरण दिले आहे , ते म्हणाले कि , “ट्रेनचा वेग फक्त इंजिनावर अवलंबून नाही, तर ज्या रुळांवर ट्रेन धावते, त्यांची देखभाल आणि स्थितीही महत्त्वाची आहे.” त्याचीही क्षमता योग्य असणे आवश्यक असते. रेल्वेबरोबरच रेल्वेच्या रूळांची डागडुजी आणि त्यांची क्षमता वाढविण्यासंदर्भात काम सुरू असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले आहे.
भारतातील सर्वात फास्ट ट्रेन –
2014 पर्यंत फक्त 31,000 किमी रेल्वे रुळांवर ट्रेन 110 किमी प्रति तास वेगाने किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावत होती. पण , आता ही मर्यादा वाढून 80,000 किमीपर्यंत पोहोचली आहे.” याचा अर्थ, आज भारतात अधिक लांबीच्या रुळांवर वंदे भारत एक्सप्रेस अधिक वेगाने धावू शकते. तसेच वंदे भारत एक्सप्रेस आज देशभरातील 136 मार्गांवर धावत आहे आणि ती भारतातील सर्वात फास्ट ट्रेन मानली जाते.