हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकसाठी (Asia Cup 2023) भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या हातात पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवण्यात आलं असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह खूप काळानंतर भारतीय संघात एका मोठया लीगमध्ये पुनरागमन करणार आहे.
यंदा आशिया चषक (Asia Cup 2023) पाकिस्तान-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. यासाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने १८ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये ८ फलंदाज, ३ फिरकीपटू, ५ जलदगती गोलंदाज आणि २ यष्टीरक्षकांचा समावेश आहे. या चमूत युवा फलंदाज टिळक वर्माचा समावेश करून निवड समितीने आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर प्रसिद्ध कृष्णालाही संधी देण्यात आली आहे. श्रेयश अय्यरने सुद्धा खूप दिवसांनी दुखापती नंतर पुनरागमन केलं आहे. या स्पर्धेनंतर लगेचच विश्वचषक स्पर्धा असल्याने भारतीय संघ कशाप्रकारे खेळतो हे पाहावं लागेल. विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, यांच्यामुळे मधली फळी मजबूत दिसत आहे, तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजामुळे संघ संतुलित वाटत आहे.
असा आहे भारतीय संघ – (Asia Cup 2023)
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा