Asia Cup 2025 : क्रिकेटप्रेमींना खुशखबर!! या दिवशी रंगणार भारत Vs पाकिस्तान सामना

Asia Cup 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Asia Cup 2025। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींसाठी खास क्षण…. मात्र दोन्ही देशांमधील तणावाच्या वातावरणामुळे अलीकडचा काही वर्षात व्दिपक्षीय क्रिकेट मालिका बघायला मिळत नाही. परंतु आयसीसी क्रिकेट स्पर्धेत मात्र अनेकदा भारत – पाकिस्तान आमनेसामने येत असतात. यंदा आयसीसी कडून Asia Cup 2025 चे नयोजन घालण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात हि स्पर्धा सुरु होणार आहे. अजून या स्पर्धेचे वेळापत्रक जारी झालं नसलं तरी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी होईल याबाबत मात्र मोठी अपडेट समोर आली आहे.

७ सप्टेंबरला भारत – पाक सामना ? Asia Cup 2025

एका रिपोर्ट नुसार, आशिया कप २०२५ ५ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतो. ५ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल तर ७ सप्टेंबरला क्रिकेट प्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय वोल्टेज सामन्याचा आनंद घेता येईल. ही स्पर्धा १७ दिवसांसाठी यूएईमध्ये खेळली जाऊ शकते . या स्पर्धेत सुरुवातीला ग्रुप स्टेज सामने होतील त्यानंतर सुपर 4 चा राउंड खेळवला जाईल. सुपर फोरच्या दोन टॉप टीममध्ये २१ सप्टेंबर रोजी आशिया चषकाचा (Asia Cup 2025) अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो असेही या अहवालात म्हंटल आहे.

आशिया कप 2025 मध्ये (Asia Cup 2025) यंदा भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगानिस्तान आणि यूएई हे संघ सहभागी होतील. मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमीरात (UAE) ला या स्पर्धेचं यजमानपद देण्यात आलं आहे. मात्र सर्व यजमानपदाचे अधिकार हे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडेच असतील. त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी होईल कि नाही याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. दरम्यान, यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात असेल. त्यामुळे, विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे स्टार भारतीय खेळाडू त्यात खेळू शकणार नाहीत. कारण त्यांनी टी२० क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. तर दुसरीकडे, जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो तर, बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी देखील आशिया कपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे, कारण ते यावेळी पाकिस्तानच्या टी२० संघाचा भाग नाहीत.