कोरोना विषाणूमुळे देशभरात आणीबाणी लागू केल्याची जपानची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी गुरुवारी संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.या घोषणेसह प्रादेशिक राज्यपाल हे नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करू शकतात,परंतु कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करू शकत नाही.अशा प्रकारे,जगातील इतर देशांतील कडक लॉकडाउनपेक्षा ही व्यवस्था खूपच कमकुवत आहे.अ‍ॅबे यांनी यापूर्वीच टोकियोसह सात भागात एक महिन्यासाठी आणीबाणीची घोषणा केली होती, जेथे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या घटनांमध्ये नुकतीच वाढ झाली आहे ज्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Rise in coronavirus infections prompts Japan to limit public ...

कोविड -१९ वर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या विशेष बैठकीत अ‍ॅबे म्हणाले, “ज्या ठिकाणी आणीबाणीच्या तरतुदी लागू करायाच्या आहेत त्या क्षेत्राचा विस्तार सात प्रांतांपासून सर्वांमध्ये करण्यात आला आहे आणि तो ६ मे पर्यंत लागू राहील. उल्लेखनीय हे आहे की ८ एप्रिल रोजी प्रारंभिक आणीबाणी शासन अस्तित्त्वात आल्यानंतर, कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती घटना आणि वैद्यकीय सेवांवरील दबाव यामुळे अनेक प्रादेशिक राज्यपालांनी आपापल्या क्षेत्रात त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला होता.

काही राज्यपालांनी आपापल्या भागात स्थानिक आणीबाणी जाहीर केली होती. तथापि, याला कोणतीही वैधानिक मान्यता नव्हती. जपानमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याच्या काही मोजक्याच घटना घडल्या आहेत. जानेवारीच्या मध्यात देशात पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली होती आणि गुरुवारपर्यंत देशात जवळपास ८,५०० संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली असून त्यापैकी १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Japanese Woman Recovered From Coronavirus Tests Positive Again ...

मात्र,स्थानिक वैद्यकीय संघटना आणि तज्ञांनी सावधगिरी बाळगली आणि अ‍ॅबे यांनी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आधीच असलेल्या लोकांना एकमेकांशी कमी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. टोकियोच्या राज्यपालांनी लोकांना घरातूनच काम करण्याचे आवाहन केले आणि त्यानंतर दररोज बाहेर जाणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीयरित्या घट झाली. जपानमधील दोन आपत्कालीन वैद्यकीय संघटनांनी या आठवड्यात संयुक्त निवेदनात चेतावणी दिली की आधीच वैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची चिन्हे आहेत आणि त्यातच रुग्णालयेही कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यास सक्षम नसल्याचे आढळले आहेत.

जपानमधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या ओसाकाच्या महापौरांनी लोकांना रेनकोट दान करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरुन वैद्यकीय कर्मचारी त्याचा वैयक्तिक संरक्षक उपकरण म्हणून वापर करु शकतील. ते म्हणाले की, त्यांना कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पॉलिथिन घालायला भाग पाडले जात आहे.

Coronavirus outbreak boosts 'hibernation' stocks in Japan ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment