इटलीनंतर आता जपानची पर्यटकांसाठी अनुदानाची योजना; सरकार देणार निम्मा प्रवास खर्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या संकटाशी झगडत आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात आर्थिक कार्यक्रम बंद आहेत. त्याचा सर्वात वाईट परिणाम हा पर्यटन क्षेत्रावर झाला आहे. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर देशातील राष्ट्रीय आणीबाणी दूर करणार्‍या जपानने आपल्या देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जपान पर्यटकांना ५० टक्के अनुदान देईल. म्हणजेच जपानमध्ये जाणाऱ्या लोकांचा निम्मा खर्च हा जपान सरकार करेल. यापूर्वीच इटलीनेही हवाई खर्चाची निम्मी रक्कम ते देणार असल्याची घोषणा केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार जपानच्या टूरिझम एजन्सीने पर्यटकांना पर्यटनस्थळांवर पुन्हा आकर्षित करण्यासाठी ही पर्यटन अनुदानाची योजना आखलेली आहे. त्याअंतर्गत पर्यटकांसाठी अर्थसंकल्पामध्ये काही भाग सरकार उभा करणार आहे. मात्र, सुरुवातीला ही योजना केवळ स्थानिक पर्यटकांनाच लागू होईल. तज्ज्ञांच्या मते, प्रवास बंदी हटवल्यानंतर इतर देशांतील पर्यटकांनाही या पॅकेजमध्ये समाविष्ट केले जाईल. एका अंदाजानुसार या योजनेसाठी जपानला एकूण १२.५ अब्ज डॉलर्स खर्च करावे लागतील. ही योजना जुलै पासून सुरु होणार असल्याचे समजते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment