कोरोनामुळे जगभरात हाहाकार,उत्तर कोरियाने पुन्हा घेतली क्षेपणास्त्रांची चाचणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग घाबरून गेले आहे, दुसरीकडे उत्तर कोरिया या सर्व गोष्टींच्या नकळत सतत क्षेपणास्त्रांची चाचणी करीत आहे. उत्तर कोरियाने रविवारी ‘सुपर लार्ज’ मल्टिपल रॉकेट लॉन्चरची चाचणी केली. यापूर्वी रविवारी दक्षिण कोरियाच्या सैन्याने सांगितले की उत्तर कोरियाने दोन शॉर्ट रेंजच्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने रविवारी सांगितले की, ही क्षेपणास्त्रे वॉनसन शहरातून डागण्यात आली.

उत्तर कोरियाचे सरकारी मीडिया केसीएनएने सांगितले की रविवारी पुन्हा एकदा ‘कोरियन पीपल्स आर्मी युनिट्स’ने आपल्या उपभोक्त्याना देण्यासाठी म्हणून प्रक्षेपण यंत्रणेच्या धोरणात्मक व तांत्रिक वैशिष्ट्यांची चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ”तथापि, केसीएनएने देशातील सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांनी या चाचणीची देखरेख केली की नाही याचा उल्लेख केला नाही, तसेच शस्त्रास्त्रे व ही चाचणी कोणत्या ठिकाणी झाली याविषयीची विस्तृत माहितीही दिली नाही.

यापूर्वी २१ मार्च रोजी उत्तर कोरियाने उत्तर प्योंगान प्रांताकडून पूर्व समुद्रात दोन लहान-अंतराच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले होते. या महिन्याच्या सुरूवातीला उत्तर कोरियाने ‘फायरिंग ड्रिल’चा भाग म्हणून अनेक क्षेपणास्त्रं डागली. अमेरिका आणि चीनने उत्तर कोरियाला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवून परत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण कोरियाच्या सैन्याने शनिवारी सांगितले की ते परिस्थितीवर नजर ठेवत आहेत. जगभरात कोरोना विषाणूची लागण ७.५ लाखाहून अधिक लोकांना झाली आहे आणि त्याद्वारे ३७ हजारांहून अधिक लोक आपला जीव गमावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

Leave a Comment