पाकिस्तानला बसला मोठा धक्का, ‘या’ ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा डाव अमेरिकेने हाणून पडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नागरिकांना जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानने बुधवारी निराशा व्यक्त केली. यासह, पाकिस्तानला अजूनही आशा आहे की UNSC त्यांच्या इतर 3 भारतीयांवर बंदी घालण्याच्या विनंतीवर विचार करेल. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा फारुकी म्हणाल्या की, 2019 मध्ये UNSC 1267 प्रतिबंध समितीने वेणुमाधव डोंगरा, अजय मिस्त्री, गोविंद पटनाईक आणि अंगरा अप्पाजी या चार भारतीयांना आतंकवादी म्हणून घोषित करण्यास पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला सांगितले होते.

चारही भारतीयांवर मोठे आरोप होते
फारुकीच्या म्हणण्यानुसार, इस्लामाबादने संयुक्त राष्ट्रांकडे केलेल्या विनंतीनुसार असा आरोप केला आहे की या चार जणांनी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, जमात उल अहरार आणि अन्य दहशतवादी संघटनांना आर्थिक, तांत्रिक आणि लॉजिस्टिक मदत देऊन पाकिस्तानच्या आत दहशतवादासाठी आर्थिक मदत तसेच प्रायोजित करत आहेत. मात्र, अहवालानुसार अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळला आणि UNSC सदस्यांना तो रद्द करण्यास सांगितला. या प्रस्तावावर मागील वर्षी तांत्रिकदृष्ट्या बंदी घालण्यात आली होती.

पाकिस्तान म्हणाला, आम्ही निराश झालो आहोत
या भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांवरील नाकेबंदीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “वेणुमाधव डोंगरा यांना दहशतवादी घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रस्तावाला विरोध झाल्याने आम्ही निराश झालो आहोत.” तर अन्य 3 भारतीय नागरिकांना दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या आपल्या विनंतीचा UNSC 1267 प्रतिबंध समिती उद्देशपूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने विचार करेल अशी पाकिस्तानला आशा आहे. “त्यांनी असेही म्हटले आहे की” हे भारतीय नागरिक सध्या भारतात खुलेपणार वावरत आहेत.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment