औरंगाबाद : वरिष्ठांकडून सेवापट पडताळणी करून देण्यासाठी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला साडेनऊ हजार रुपये लाच मागून ती स्वीकारणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला एसीबीने रंगेहाथ अटक केली. बुधवारी उच्च शिक्षण सह संचालक कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
ज्ञानोबा बळीराम निर्मळ (५४) असे लिपिकाचे नाव आहे. ग्रंथालय परिचर म्हणून सेवा निवृत्त झालेल्या ६२ वर्षीय कर्मचाऱ्याने निर्मळ यांच्याकडे अर्ज केला होता. वरिष्ठांकडून सेवापट पडताळणी करण्यासाठी निर्मळने त्यांना साडेनऊ हजार रुपये मागितले. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली.
खाडे यांनी जालना पथकाचे निरीक्षक एस.एस.शेख यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक एस. एस. शेख यांनी सापळा रचला. त्यात निर्मळ अलगद अडकला. त्यानंतर शेख यांनी अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गजानन कांबळे, ज्ञानेश्वर म्हस्के यांनी छापा निर्मळ यांना रंगेहाथ पकडले.