Assam Crude Oil : नाद खुळा!! या जिल्ह्यात सापडले कच्च्या तेलाचे साठे; आता पैसाच पैसा

Assam Crude Oil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Assam Crude Oil । भारताला दुसऱ्या देशातून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करावं लागत असल्याने यावरच सरकारचा सर्वाधिक पैसे खर्च होतोय. परंतु आता हि चिंता काही प्रमाणात मिटणार आहे. कारण आसाम राज्यात आता कच्च्या तेलाचे साठे सापडले आहेत. आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यातील नामरूप बोरहाट-१ या विहिरीत हायड्रोकार्बन सापडले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी दिली. या साठ्यामुळे थेट तेल उत्पादन करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या विहिरीत राज्य सरकारची लक्षणीय हिस्सेदारी आहे, असेही हिमांता बिस्व सर्मा यांनी सांगितले.

हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल कि, अभिमानाचा क्षण!! ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक लवचिकतेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल.ऑइल इंडिया लिमिटेड ने नामरूप बोरहाट-१ विहिरीत हायड्रोकार्बनची उपस्थिती शोधून काढली आहे. या विहिरीत आसाम सरकारचा मोठा वाटा आहे. या शोधामुळे आसाम थेट तेल उत्पादक (Assam Crude Oil) राज्य बनला आहे, अन्वेषण प्रयत्न यशस्वी होतात, आसामला महसूल आणि रॉयल्टी मिळेल आणि देशासाठी ऊर्जेची स्थिर उपलब्धता सुनिश्चित होईल.

आसाम भारताच्या तेल अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक – Assam Crude Oil

अनेक तज्ज्ञांच्या मते, दिब्रुगड जिल्ह्यात स्थित, नामरूप बोरहाट-१ हायड्रोकार्बन रिझर्व्ह हा केवळ राज्यासाठीच नव्हे तर भारताच्या व्यापक तेल आणि वायू क्षेत्रासाठी एक उत्तम धोरणात्मक शोध मानला जात आहे. या शोधामुळे आसामला संसाधन पुरवठा करणाऱ्या राज्यापासून तेल उत्पादनात (Assam Crude Oil) सक्रिय भागीदार बनण्यास मदत होईल, ज्यामुळे राज्य पातळीवर महसूल आणि रॉयल्टी निर्माण करण्याचे नवीन मार्ग खुले होतील असं विश्लेषकांचे मत आहे. अनेक दशकांपासून, आसाम भारताच्या तेल अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक राहिला आहे. १८८९ मध्ये डिग्बोई येथे देशातील पहिला तेल शोध लागला होता आणि आजही हे राज्य कच्च्या तेलाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीवरून २०२३-२४ मध्ये, आसामने ४,३६१ हजार मेट्रिक टन (टीएमटी) कच्च्या तेलाचे उत्पादन केले. देशातील राजस्थान आणि गुजरात हि दोन राज्येच याबाबतीत आसामच्या पुढे आहेत.