व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दंगलीत IPS अधिकार्‍यावर फायरिंग; पोलिस अधिक्षक निंबाळकर गोळी लागून जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसाम-मिझोरम सीमेवरील हिंसाचारात आसाम पोलिसांच्या 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मुळचे बारामतीचे असलेले व सध्या आसाममधील कचारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक असणारे वैभव निंबाळकर (Vaibhav Nimbalkar) यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती ठिक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेवेळी निंबाळकर हे त्यांच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत कचारा जिल्ह्यामध्ये बंदोबस्तावर होते. त्यावेळी मिझोरमकडील नागरीकांनी आसाम पोलिसांच्या दिशेने गोळीबार व जोरदार दगडफेक केली. त्यावेळी निंबाळकर यांच्यावर देखील गोळीबार झाला. सुदैवाने निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थितअसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

कोण आहेत वैभव निंबाळकर –

वैभव निंबाळकर हे मुळचे बारामतीचे असून 2009 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना आसाम केडर मिळाल्यानंतर तेव्हापासून तिथेच कार्यरत आहेत. त्यांनी काचार जिल्ह्यात यापूर्वीही काम केले आहे. काचार येथे अधिक्षक म्हणून ते 17 मे रोजी रुजू झाले आहेत. त्यापूर्वी ते तीनसुखिया येथे अधिक्षक होते.