प्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात स्वच्छता निरीक्षक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर वारंवार हल्ले होण्याचे प्रकार घडत असताना शनिवारी सकाळी वान्लेसवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सांगली व मिरज शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुले, जेष्ठ नागरिकांवर हल्ले केले आहेत. काही ठिकाणी जनावरांवर देखील हल्ले होत आहेत. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या डॉग व्हॅन अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे फिरत नाहीत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची टोळके आता नागरिकांवर जीव घेणे हल्ले करत आहेत.

शनिवारी सकाळी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी प्रभाग क्रमांक 19 मध्ये कामासाठी आले होते. जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या जागेत भटक्या कुत्र्यांच्या टोळीतील एका कुत्र्याने मद्रासी यांच्या अंगावर झेप घेतली. त्यांना खाली पाडून त्यांच्या चेहऱ्यावर हातावर हल्ला केला. यामध्ये मद्रासी रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला.

Leave a Comment