एकही मतदार न आल्याने कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रातच पंगत करून केले जेवण; जळगावचा प्रकार समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान चालू झालेले आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून कलाकारांकडून देखील मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपण मतदान केले पाहिजे, असे आव्हाने आवाहन जनतेला केले जात आहे. अनेक ठिकाणी मतदान देखील जोरात चालू झालेले आहे. परंतु जळगाव मधील एरंडेल मतदार संघात एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे.

या मतदार केंद्रावर ती कुणीच मतदान करायला आले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या लोकांनी पंक्तीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
राज्यभरात मतदानाचा उत्साह सुरू आहे. लोकांनी मतदान करावे यासाठी आज सुट्टी देखील दिलेली आहे. तसेच काही स्थानिक पक्षांकडून लोकांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये मतदार केंद्रावर मतदार न आल्याचे चित्र समोर आलेले आहे.

एरंडोल विधानसभा क्षेत्रातील वडगाव मतदान केंद्र क्रमांक 214 या ठिकाणी सकाळपासून मतदान करायला लोक आलेले नाही. तेथील काही लोकांनी सकाळी मतदान केले. परंतु त्यानंतर कोणीही आले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाची कर्मचारी कंटाळले आणि दुपारची वेळ झाल्यानंतर त्यांनी भूकही लागली होती. मतदार न आल्यामुळे त्या मतदान अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणीच जेवणाची पंगत पाडली.

मतदान केंद्रातून हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. कर्मचारी मस्तपैकी बसून जेवत आहे. तसेच पोलीस कर्मचारी देखील या जेवणाच्या पंक्तीचा आनंद घेत आहेत. दुपार झाली तरीदेखील या गावातील अनेक लोकांनी अजूनही मतदान केलेले नाही.