हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. तसेच मिझोराम राज्याची मतमोजणी 3 डिसेंबर ऐवजी 4 डिसेंबर रोजी होणार आहे. नुकत्याच 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या राज्यांतील विधानसभांची मुदत डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपणार आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि विविध प्रादेशिक पक्षांचा समावेश असलेल्या प्रमुख राजकीय घटकांसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पाच राज्यांपैकी राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. तेलंगणा हे केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली आहे. तसेच, मिझोराम हे मिझो नॅशनल फ्रंट (MNF) द्वारे शासित आहे.
Dailyhunt कव्हरेज
महत्वाचे म्हणजे, सर्वसमावेशक निवडणूक कव्हरेज आणण्यासाठी एका नवीन उपक्रमातून डेलीहंटने त्याच्या नव्याने सुधारित निवडणूक क्षेत्राचे अनावरण केले आहे. मूलभूत गोष्टींच्या पलीकडे जाणारे एक नवे मानस ठेवून आम्ही पक्षाची माहिती, उमेदवार याद्या, रिअल-टाइम अपडेट्स देणार आहोत. त्याचबरोबर, निवडणूक कार्ड, सर्वसमावेशक उमेदवार प्रोफाइल आणि निःपक्षपाती विश्लेषण याविषयी संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. इतकेच नव्हे तर, मल्टीमीडियाचा समृद्ध अनुभव देत आम्ही निवडणुकीचे व्हिडिओ, लाइव्ह अपडेट्स, आकर्षक क्विझ अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुमच्या सर्व निवडणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डेलीहंट तुमचे वन-स्टॉप डेस्टिनेशन असावे हे आमचे ध्येय आहे.
डेलीहंट विधानसभा निवडणुकीचे थेट निकाल सक्रियपणे कव्हर करत आहे. निवडणुका या कोणत्याही आकडेवारीच्या पलीकडे आहेत हे ओळखून आमचे लक्ष डेटा प्राप्त करणे, नमुने ओळखणे आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करणारे विश्लेषण प्रदान करणे यावर आहे. जसजशी आकडेवारी समोर येत जाईल, तसतसे आम्ही तुमच्यापर्यंत विविध दृष्टिकोनातून करण्यात आलेले सखोल विश्लेषण पुरवू. तसेच, सर्वसामान्य ते राजकीय तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकासाठी विश्लेषणात्मक डेटा सादर करू.
Dailyhunt कव्हरेजमध्ये पुढील मुद्दे समाविष्ट असतील
1) पाच राज्यांमधील निकालांचे लाइव्ह कव्हरेज
2) अचूक आकडेवारी, मागील निकालांशी तुलना
3) जागांचे अपडेट
4) लाइव्ह व्हिडिओ, व्हायरल मीम्स,
5) ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडिओ
6) ट्विटरवरील ट्रेंड
7) सखोल विश्लेषण
8) सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
9) निवडणुकांच्या सर्व घडामोडी