दिंडोरी : हॅलो महाराष्ट्र – राजकारणी लोक म्हंटले कि त्यांच्या मागे असणाऱ्या कामाचा व्याप पाहता त्यांना इतर गोष्टींचा आनंद घ्यायला वेळ मिळतो की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काही राजकारणी मंडळी अशी आहेत जे कामाचा कितीही व्याप असला तरी रोजच्या कामातून थोडा वेळ काढून आनंद लुटत असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा आदिवासी गाण्यावर धरला ठेका pic.twitter.com/8Wpyq7otdC
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 8, 2022
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (narhari zirwal ) यांचा तो व्हिडिओ आहे. त्यांच्या डान्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नरहरी झिरवळ (narhari zirwal ) यांनी यावेळी पाच पांडवांचे मुखवटे घालून डान्स केला. दिंडोरीच्या बोपेगाव येथे सुरू असलेल्या बोहडा उत्सवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सहभागी झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी डोक्यावर पांडवाचे मुखवटे घालून आदिवासी नृत्य केले होते.
दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव बोहडा उत्सव सुरू असून त्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (narhari zirwal ) केवळ सहभागीच झाले नाही तर त्यांनी संबळवर ठेका धरत आदिवासी नृत्यदेखील केले. त्यानंतर त्यांनी डोक्यावर पांडवाचे मुखवटे घेऊन नाचवले. बोहडा हे ग्रामीण भागातील एक कला नृत्य असून अक्षयतृतीयेपासून नाशिकच्या ग्रामीण भागात गावांमध्ये केले जाते. ग्रामीण भागातील हि परंपरा सांस्कृतिक प्रकार असून त्यास शुभ मानले जाते.