हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | अंतराळातून तुटलेले दोन लघुग्रह पृथ्वीकडच्या दिशेने वेगाने येत असून पृथ्वीच्या जवळून जातील. अशी शक्यता नासाच्या ‘सेंटर फोर नियर ऑब्जेक्ट स्टडीज’ यांनी वर्तवली आहे. हे दोन लघुग्रह लागोपाठ तुटून काही दिवसाच्या अंतरावर पृथ्वीच्या दिशेने येत आहेत.
क्रमांक एकचा लघुग्रह 2020P हा 23 जानेवारी रोजी पृथ्वीच्या 43 लाख दुरून जाईल आणि त्याची गती 18700 मैल प्रती तास इतकी असेल. तसेच दूसरा लघुग्रह 2010JE87 हा सोमवार 25 जानेवारी रोजी पृथ्वीच्या 37 लाख मैल दूरवरून जाईल. हा लघुग्रह 430 मिटर व्यासाचा आहे. पण हे लघुग्रह दूरवरून जात असल्यामुळे पृथ्वीला काही धोका नाही. अश्या शक्यता नासाने वर्तवल्या आहेत.
लघुग्रह म्हणजे काय?
वायु मंडळात गेल्यावर अंतराळात असलेले मोठे मोठे खडक व दगड हे छोट्या – छोट्या तुकड्यांमध्ये विभाजीत होतात. यालाच लघुग्रह असे म्हटले जाते. लघुग्रह मोठे असतील आणि पृथ्वीवर पडले तर खूप मोठे नुकसान होऊ शकते. लघुग्रह बऱ्याच वेळा समुद्रामध्ये पडतात कारण पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी आहे.