बॉलीवूडचे बादशाह म्हणून ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे बॉलीवूड सेलिब्रिटी अभिनेते सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान. सध्या हे दोन्ही अभिनेते सीनियर असले तरी देखील त्यांचं वजन मात्र बॉलीवूडमध्ये खूप जास्त आहे आणि अशाच दोन मोठ्या सेलिब्रेटींविषयी एका ज्योतिष आणि एक धक्कादायक अशी भविष्यवाणी केली आहे. कोणतीही साधीसुधी गोष्ट नाही तर एका ज्योतिषाने या दोघांच्या मृत्यूचे वय जाहीर केले आहे. चला बघूया नेमके त्यांनी काय म्हटले आहे.
सोशल मीडियावर सध्या एक बॉलीवूड पर्सनॅलिटीचा मुलाखतीचा शो प्रसिद्ध आहे. सिद्धार्थ कन्नन याच्या मुलाखती सोशल मीडियावर चर्चेत असतात. विविध बॉलीवूड आणि टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या व्यक्तींशी हा मुलाखतकार संवाद साधत असतो आणि त्याने नुकतीच ज्योतिषी सुशीलकुमार यांची मुलाखत घेतली आहे. सुशील कुमार हे चान्गले नाडी आणि ज्योतिष विद्या अभ्यासक आहेत. या मुलाखती दरम्यान ज्योतिषी सुशील कुमार यांनी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे.
या मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले की, “सलमान आणि शाहरुख खान या दोघांचेही आयुष्य कमी आहे. सध्या सलमानचे वाईट दिवस सुरू आहेत तर शाहरुख खानचं सगळं काही ठीक सुरू आहे पण येत्या काळात सलमान खानला एक असाध्या आजार होणार आहे. हे मी आधीही बऱ्याचदा सांगितला आहे या आजारामुळे त्याला शेवटच्या काळातही खूप त्रास होणार आहे ” असं त्यांनी मुलाखतीमध्ये म्हटला आहे.
एवढेच नाही तर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या दोन्ही स्टार्सचा मृत्यू एकाच वर्षी होणार असून 67.5 इतकच आयुष्य या दोघांचं आहे. त्याचवेळी त्यांचा मृत्यू आहे. मी ज्या विद्या शिकलो आहे त्यात मृत्यूची भविष्यवाणी एकदम अचूक करता येते. असे देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटला आहे.
ज्योतिषी सुशीलकुमार यांच्या या भविष्यवाणीमुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्यावर टीका केली आहे कोणताही ज्योतिषी कोणाच्या मृत्यूची भविष्यवाणी करत नाही अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.