अखेर ‘तो’ चिमुकला आईच्या कुशीत; जन्मदात्यानेच केले होते अपहरण

0
71
MIDC waluj police station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | भांडण झाल्यामुळे आईसोबत माहेरी निघालेल्या पत्नीला मारहाण करून तीन महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी येथे शनिवारी घडली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सुखरूप त्या तीन महिन्याच्या चिमुकल्याला आईच्या हवाली केले. चिमुकला परत मिळाल्याने आईने पोलिसांचे आभार मानत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

हाती आलेल्या माहितीनुसार डोंगरगण अहमदनगर या ठिकाणी वस्तीस असणाऱ्या अपर्णा गाडेकर या महिलेने दोन वर्षांपूर्वी गावातील संदीप दिलीप कदम यांच्या सोबत प्रेम विवाह केला होता. दोघांचा संसार सुरु असताना संदीप हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा निघाला त्याने पत्नी अपर्णा छळ सुरू केला. तीन महिन्यापूर्वी म्हणजे 27 मे रोजी त्यांना एक अपत्य झाले. मुलगा झाल्याचे कळताच आनंदित झालेल्या संदीप ने दोन महिन्यापूर्वी पत्नी अपर्णा व बाळाला सोबत घेऊन वाळूज एमआयडीसी गाठले आणि रोजगाराच्या शोधात फिरू लागला. परंतु काही दिवसांनी संदीपने पुन्हा पत्नीला मारहाण करून त्रास दिल्याची घटना घडली होती. यामुळे अपर्णाच्या आईने संदीप ला समजावले परंतु त्याने अरेरावी करण्यास सुरुवात केली. यामुळे अपर्णा हिने आई सोबत माहेरी जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे संतप्त झालेल्या संदीप ने दोघेहि बसलेल्या असलेल्या रिक्षाचा पाठलाग करून रांजणगाव फाट्याजवळ रिक्षा अडवली आणि 3 महिन्याच्या चिमुकल्या मुलाला हिसकावून तो पळून गेला होता.

याप्रकरणी सर्व माहिती मिळताच बंदोबस्तासाठी शहरात गेलेल्या पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी तात्काळ संदीपचा शोध घेण्यास हालचाल सुरू केली होती. याचबरोबर उपनिरीक्षक निर्वळ यांनी अपर्णा व तिची आई सुजाता यांच्यासोबत सहकाऱ्यांच्या मदतीने भरपावसात वाळूज परिसरात शोध घेतला, याच दरम्यान संदीपने फोनवर बाळ दूध पितानाचे फोटो पाठवून फोन बंद केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रॅक केल्यानंतर संदीप करमाळा परिसरात असल्याचे कळताच पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच संदीप तिथुन माघारी फिरला. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास संदीप चिमुकल्याला घेऊन पंढरपुरात आला. हे त्याने रांजणगावात राहत असलेल्या मामाला सांगितली. यानंतर मामा व अपर्णा आणि तिची आजी शोभाबाई वाकचौरे हे दोघे पंढरपुरला आल्यानंतर त्याने चिमुकल्याला त्यांच्याकडे सोपवून त्याने पोबारा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here