Ata Maker Bag | हात खराब न करता अगदी 5 मिनिटात मळा कणिक; बाजारात आली ही नवीन पिशवी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ata Maker Bag | भारतातील जेवणामध्ये चपातीचा समावेश प्रत्येक घरामध्ये केला जातो. चपाती भाजीनेच अनेक लोकांच्या दिवसांची सुरुवात होते. त्याचप्रमाणे ऑफिस टिफिन, मुलांच्या शाळेचे डबे यात देखील चपाती भाजी दिली जाते. परंतु सकाळीच्या गडबडीत महिलांसाठी चपात्या बनवणे हा एक खूप मोठा टास्क असतो. कारण चपात्या बनवण्यासाठी जास्त वेळ जातो. चपात्या लाटण्यासाठी सगळ्यात आधी चपातीचे कणीक मळून घेणे गरजेचे असते. आणि तेच कणिक मळायला (Ata Maker Bag) खूप जास्त वेळ जातो. त्यामुळे खूप जास्त पसारा देखील होतो.

कणिक मळताना (Ata Maker Bag) गव्हाच्या पिठामध्ये पाणी, तेल, मीठ हे सगळं घालून हाताने ते मळून घ्यावे लागते. त्यानंतरच त्याच्या चपात्या लाटाव्या लागतात. परंतु जर कणिक मळताना थोडीशी जरी गडबड झाली तरी चपात्या कडक येऊ शकतात. त्यामुळे हे चपातीचे पीठ खूप काळजीपूर्वक आणि चांगले मळणे गरजेचे असते. परंतु अनेक स्त्रियांना सकाळच्या गडबडीत हेच कणिक मळण्याचा खूप मोठा टास्क असतो. त्यामुळे किचन ओट्यावर खूप जास्त पसारा देखील होतो. तसेच त्यांचे हात खराब होतात आणि वेळ देखील खूप जातो.

बाजारामध्ये पीठ मळण्यासाठी एक नवीन आयडिया आलेली आहे. त्यामुळे तुमचे पीठ देखील कमी वेळात मिळून होईल. आणि तुमचे हात सुद्धा खराब होणार नाही. सध्या बाजारात पीठ मिळण्यासाठी एका अनोख्या पिशवीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पिशवीचा वापर करून तुम्ही अगदी काही वेळातच हे कनिक मळू शकता. त्याचबरोबर तुमचे हात देखील खराब होणार नाही आणि किचन ओट्यावरही पसारा होणार नाही.

कणिक मळण्यासाठी बाजारात जी पिशवी उपलब्ध आहे. ती सिलिकॉन प्लास्टिकने बनवलेली आहे. ज्यामुळे तुमचे हात खराब होत नाहीत. या पिशवीमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे पीठ घालून त्याचप्रमाणे तेल आणि हा गरजेनुसार पाणी टाकून आपण पीठ मळतो तसे पीठ मळायचे आहे. ही पिशवी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग ॲप वरून देखील ऑर्डर करू शकता.