फलटण | फलटण तालुक्यातील मलवडी गावामध्ये सामाईक विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या भांडणामध्ये भावानेच भावाच्या डोक्यामध्ये व हातावर कुर्हाडीचे घाव करून गंभीर जखमी केले असल्याची घटना घडली. याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिलेली माहिती अशी की, फलटण तालुक्यातील मलवडी गावामध्ये फिर्यादीचे दिर किसन साहेबराव बागाव (वय- 72) यांनी रात्री अकराच्या सुमारास येऊन घराचे दार वाजवले व दार उघडून आतमध्ये आल्यानंतर झोपलेल्या त्यांच्या भावावर हल्ला केला. या हल्यात बाळू साहेबराव बागाव, (वय- 74) यांच्या डोक्यामध्ये व हातावर कुर्हाडीचे वार करून जखमी केलेले आहे.
घटनास्थळी फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्यासह फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भेट दिलेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन. जाधव करीत आहेत.