Atal Pension Yojana | स्त्री असो वा पुरुष; 60 वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारकडून वर्षाला मिळणार 60,000 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Atal Pension Yojana | आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे समाजातील नागरिकांना मदत करण्यासाठी आणि आर्थिक संरक्षण देण्यासाठी नेहमी तत्पर असतात. सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सामाजिक हित जोपासावे या प्रयत्नातून शासनाकडून विविध योजना आणल्या जातात. अगदी महिलांचा कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा लहान मुलांचा जेष्ठ नागरिकांचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सरकारने अनेक योजना सुरू केलेले आहे. म्हातार वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पैशांची अडचण भासू नये. तसेच त्यांचा दवा खर्च त्यांना करता यावा. यासाठी सरकारने अटल पेन्शन योजना चालू केली आहे. अटल पेन्शन योजना ही मोदी सरकारची एक योजना आहे.

सरकारच्या या अटल पेन्शन (Atal Pension Yojana ) योजनेअंतर्गत वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दर महिन्याला 5 हजार रुपयांचे पेन्शन मिळते. परंतु यासाठी नागरिकांना सुरुवातीला काही पैसे गुंतवावे लागतात. या योजनेमध्ये सहभागी घेतल्यावर तुम्ही नोकरी करत असताना किंवा तरुणपणापासूनच यामध्ये तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतात. आणि त्यानंतर तुमच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाली की, दर महिन्याला 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन तुम्हाला मिळते. म्हणजेच एका वर्षात सरकारकडून 60 हजार रुपयांची स्पेशल नागरिकांना मिळते. सरकारची ही योजना फार जुनी योजना आहे. परंतु अनेक लोकांना याबद्दल अजूनही माहिती नाही. आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे अटल पेन्शन योजना? | Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकते. 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेचा एखाद्या व्यक्तीने 18 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तर वयाच्या 60 वर्षांपर्यंत त्यांना दर महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागतील. 18 व्या वर्षी या योजनेत 210 रुपये गुंतवणूक केली तर 60 व्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर त्याला दर महिन्याला पाच हजार रुपयांची पेन्शन मिळेल. म्हणजेच एका वर्षात त्यांना 60 हजार रुपये मिळेल.

अर्ज कुठे करायचा ? | Atal Pension Yojana

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल आणि गुंतवणूक करायची असेल. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरा. आणि तो फॉर्म बँकेत जमा करा तसेच या योजनेसाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्यानुसार तुम्ही कागदपत्र द्या. आणि दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून हे पैसे आपोआप कट होतील.