नवी दिल्ली | अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती जैसे थे अशीच असल्याचे एम्स रुग्णालयाने प्रसारित केलेल्या मेडीकल बुलेटीन वरुन स्पष्ट झाले आहे. वाजपेयी मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असून सध्या त्यांच्यावर दिल्ली एम्स मध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळी नऊ वाजता जाहीर होणारे मेडिकल बुलेटिन ११ वाजून ५ मिनिटांनी जाहीर करण्यात आले आहे. वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हॅटिलेटर वर ठेवण्यात आले आहे असे या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे.
दरम्यान देशाचे २२ मंत्री एम्स मध्ये दाखल झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अमित शहा हे ही एम्समध्ये उपस्थित झाले आहेत. एम्स रुग्णालयाबाहेर पोलीस संरक्षण वाढवण्यात आल्याने कार्यकर्त्यां च्या मनात उलट सुलट विचार येऊ लागले आहेत. एकंदरीतच दिल्ली एम्स बाहेरील वातावरण अत्यंत चिंताजनक बनले आहे.
Former Prime Minister Atal Bihari Vajpayee's condition continues to remain the same. He is critical and on life support systems: AIIMS statement pic.twitter.com/OJKHHcTDSn
— ANI (@ANI) August 16, 2018