दिल्ली | माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्नालयात उपचार सुरु आहेत. वाजपेयी गेल्या दोन महिण्यांपासून एम्समधे दाखल आहेत. आज त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि भाजपा नेत्या स्मृती इरानी यांनी वाजपेयी यांची हाॅस्पिटल मध्ये जाऊन भेट घेतली.
यावेळी एम्स हाॅस्पिटल चे संचालक रणदिप गुलारिया यांनी मोदींना वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबद माहिती दिली. गेले तीन दिवस वाजोेयी वेंटीलेटर वर असून त्यांची प्रकृती खालावली असल्याचे समजत आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, सुरेश प्रभू, हर्ष वर्धन, अश्विन चौबे व जितेंद्र सिंग आदींनी बुधवारी रात्री अटलबिहारी वाजपेयी यांची एम्स रुग्नालयात भेट घेतली.