डाॅ. जयंत कुलकर्णी
अटलजी गेले. गेली आठ-नऊ वर्षे आजारपण सोसणारे अटलजी आज इतिहासाचा भाग झाले. मनाचा ठाव घेणारी, संयमित शब्दांची पण आवेशपूर्ण लयीची त्यांची भाषणे माझ्या पिढीतील जवळपास सगळ्यांनीच ऐकली आहेत. किंबहुना लाखांच्या समूहासमोरची त्यांची भाषणे आम्ही केवळ ‘ऐकण्या’ पेक्षाही ‘अनुभवली’ आहेत. नव्या पिढीला ती आवर्जून सांगितली जातील. माध्यमांवर ती पुन्हा पुन्हा ऐकली जातील. त्यांचे संपूर्ण ‘व्यक्तित्व’च ज्यात तंतोतंत उतरले आहे अशा त्यांच्या कविता वारंवार वाचल्या आणि ऐकल्याही जातील. दिल्लीतील त्यांचे ‘स्मृति’स्थळ हे आगामी पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत बनेल. या सगळ्यांमध्ये सामावूनही त्यांचे व्यक्तित्व आणखी बरेच काही उरेल !
इतर महत्वाचे लेख –
अटलबिहारी वाजपेयींच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?
अटल बिहारी वाचपेयींच्या नावावरील हे राजकीय रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही
भारतीय राजकारणात गांधी-नेहरूंच्या प्रभावात रूढ झालेल्या अनेक संदर्भांना, व्याख्यांना आणि समजांना त्यांनी समंजस आणि सोशिक विरोध करून, आदर आणि आंतरिक स्नेहाच्या आधारे अधिक देशानुकूल आणि त्या अर्थाने युगानुकूलही बनवले. स्वतः जडणघडण केलेल्या पक्षाला राजकीय विचारधारांच्या मुख्य प्रवाहात नव्हे तर त्या प्रवाहाच्या केंद्रस्थानी आणले. जे परिवर्तन त्यांना राजकारणात आणायचे होते, त्या पायवाटांवरती ते आणि त्यांचे सहकारी अथकपणे तडजोड न करता चालत राहिले. आपल्या व्यक्तित्वाचा एकेक पैलू उजळून त्यांनी या पायवाटांचे रूपांतर जनमार्गांमध्ये केले.
भाषणांतून, कवितेतून, साठ वर्षांच्या एकसलग संसदीय कार्यातून आणि पंतप्रधान म्हणून बजावलेल्या कामगिरीतून अटलजी जसे दिसतात तसेच किंवा त्याही पेक्षा काकणभर अधिक ते या उपेक्षित पायवाटांवर चालतांना, सहकाऱ्यांना दिलेल्या आधारातून, देशभर जोडलेल्या माणसांतून, सच्च्या कार्यकर्तेपणातून, भाषणाच्या सुरुवातीलाच फेकलेल्या त्या त्या भाषेतील नजाकतीच्या वाक्यांतून,साथीदारांची निराशा घालवणाऱ्या निर्भेळ विनोदांतून, तिरस्कार पचवून केलेल्या मिश्किल टिप्पणीतून आणि मुख्य म्हणजे त्या मागच्या दृढतम निर्धारातून दिसतात !
जनसंघाच्या स्थापनेचा काळ.मुंबईतील मधुकरराव महाजनांच्या घरीच बैठका चालायच्या. सुशीलाताई महाजनांनी तो सगळाच काळ आपल्या ‘डाव मांडियेला’ आत्मचरित्रात शब्दबद्ध केलाय. त्यांच्यासारख्या अनेक प्रांतातील अनेक घरातून झालेला तरुण वयातील अटलजींचा वावर, त्यातील सहजता, त्यांची ऋजुता आणि पक्षाचा तुटपुंजा निधी वाचविण्यासाठी केलेल्या काटकसरीच्या नानाविध तऱ्हा वाचल्या की लक्षात येते कि राजकारणात मूल्यांचा आदर्श म्हणून स्वतःच्या संपूर्ण आयुष्यालाच उभे करण्याची नैतिकता या माणसात कुठून आली !
इतर महत्वाचे लेख –
२०१९ची निवडणूक आम्ही विक्रमी जागांनी जिंकणार – नरेंद्र मोदी
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
परराष्ट्र धोरणांवरील एका चर्चेत बोलतांना ‘बोलण्यासाठी वाणी हवी पण गप्प राहण्यासाठी वाणी आणि विवेक दोन्हींची गरज असते’ या अटलजींच्या वाक्याची दाखल घेत पंडितजींनी आपल्या इंग्रजीतील उत्तराची गाडी जाणीवपूर्वक हिंदीकडे वळवली व अटलजींच्या मुद्द्याचे विस्तृत समर्थन केले. नेहरूंच्या गटनिरपेक्ष धोरणाचे ते कट्टर समर्थक असले तरी ‘शांतता हवीच पण देशाच्या सार्वभौमत्वाकडे दुर्लक्ष व्हायला नको’ या आपल्या आग्रहाचेच अटलजींनी पुढे राजकीय धोरणात रूपांतर केले आणि जनसंघाचे काश्मीर, तिबेट पासून गोवामुक्तीच्या प्रश्नावरचे अनेक लढे त्यातूनच उभे राहिले. धर्मनिरपेक्षतेच्या एकाच बाजूकडे झुकलेल्या लंबकाला त्यांनी कायमच विरोध केला. तो ‘समतोल’ असला पाहिजे हे त्यांचे सांगणे म्हणजे जातीयवाद ठरवला गेला. आक्रमक न बनत अटलजी संयमाने प्रतिवाद करीत राहिले आणि म्हणता म्हणता त्यांनी हा ही आग्रह पक्षाची ओळख बनवला. ज्या ज्या मुद्द्यांचा आग्रह धरून भाजपने गेल्या वीस वर्षांत जनमानसाची पकड घेतली त्या सर्वांचा मूलस्रोत म्हणजे अटलजींनी साठ वर्षांत केलेली संसदेतील भाषणेच आहेत.
या वैचारिक स्पष्टतेचा केंद्रबिंदू होता तो त्यांचे संघ समर्पित व्यक्तित्व ! १९५७ च्या निवडणुकीत बालरामपूर या पूर्वीच्या एका छोट्या संस्थानातून ते निवडून आले. संघाचे त्या क्षेत्रातील प्रचारक प्रताप नारायण तिवारी यांचा व्यापक जनसंपर्क हेच जनसंघाच्या या पहिल्या विजयाचे गमक होते हे ते वारंवार सांगत असत. ‘हिंदू तन मन.. हिंदू जीवन .. रग रग हिंदू मेरा परिचय’ या कवितेत त्यांनी आपला ‘हिंदू’ असण्याचा अर्थ सांगितलाय. हे असे उदार आणि व्यापक पायावर आधारित असलेले ‘हिंदुत्व’च त्यांनी राजकीय विचारधारांच्या थेट केंद्रस्थानी आणले. वैचारिक आग्रह असले तरी प्रत्यक्ष देश चालवतांना या आग्रहांचेच अडथळे न होऊ देण्याची सम्यकताही त्यांनीच दाखवली!
आचार विचारात ढिसाळपणा असेल तर संघटनांचे गड म्हणता म्हणता ढासळतात. संघासारख्या देशव्यापी संघटनेचे स्वरूप हे थोडे कर्मठच राहणार हे समजण्याची प्रगल्भता जनसंघाच्या आघाडीच्या या सगळ्याच नेत्यांकडे होती. हीच विचारधारा घेऊन राजकीय क्षेत्रात उभे राहतांना मात्र अटलजींनी त्यात आपल्या व्यक्तित्वाचे, प्रतिभेचे सगळेच रंग इतक्या खुबीने मिसळले की संघावर पक्षाची छाया कधी पडली नाही कि पक्षाला संघाचे ओझे वाटले नाही ! संघ ते पक्ष हा सांधा जोडताना अटलजी त्यात एकरूप होऊन गेले.
डाॅ. जयंत कुलकर्णी