‘या’ IAS अधिकार्‍यावर तरुणींनी पाडला हार्ट इमोजीचा पाऊस; नुकताच झालाय Divorce

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आकर्षक डोलेशोले असणारा सिक्स पॅक असलेला व एकदम चांगले लूक असणाऱ्या चित्रपटातील हिरोंवर तर तरुणी फिदा होतातच. शिवाय आपल्या सूंदर अशा माचो स्टाईलने तरुणींना स्वतःकडे खेचून घेतात. मात्र, असा एक अधिकारी आहे कि जो एखाद्या हीरोलाही मागे टाकेल. तो सध्या आपल्या सूंदर दिसण्यामुळे लाखो तरुणीच्या दिलाची धडकन बनला आहे. सध्या त्याच्यावर तरुणींकडून कार्ट इमोजीचा पाऊस पाडला जात आहे. विशेष म्हणजे त्याचा नुकताच घटस्फोट झाला आहे. तो आहे IAS अधिकारी अतहर अमीर खान होय.

https://www.instagram.com/p/CcQTG4IPLMd/?igshid=MDJmNzVkMjY=

 

भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात आयएएस अधिकारी असणारे अतहर अमीर खान यांनी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली आहे. या मागे कोणतं कारण असेल तर त्यांचा दिसणारा सूंदर असा लूक म्हणावा लागेल. खान हे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. ट्विटर असो, इंट्राग्राम असो किंवा फेसबुक यांच्या माध्यमातून त्यांचे लाखो फॉलोअर्स झाले आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध असणाऱ्या अतहर खान यांच्यावर सध्या तरुणींकडून हार्ट इमोजीचा पाऊस पाडला जात आहे. यामागचे कारण कोणते असेल तर खान यांनी नुकताच एक फोटो इंट्राग्राम, फेसबुकच्या माध्यमातून शेअर केला आहे. तो सध्या इतका व्हायरल झाला आहे कि त्यांच्या फोटोवर १९ तासात १ लाख २२ हजार ५५७ जणांनी लाईक केले आहे.

विशेष म्हणजे यामध्ये तरुणींचा जास्त समावेश आहे. तर १९ तासात २० हजाराहून अधिक लोकांनी लाईक तर २२ हजार जणांनी कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्या फोटोवर कित्येक मुलींनी हार्ट इमोजी पाठवून प्रेमही व्यक्त केले आहे. सध्या आयएएस अतहर श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. त्याच बरोबर त्यांच्याकडे श्रीनगर स्मार्ट सिटी लिमिटेडचे ​​सीईओ या पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

झाला आहे ‘या’ तरुणीसोबत घटस्फोट

2015 सालच्या UPSC परिक्षेतील दुसरे टॉपर असणारे आयएएस अधिकारी अतहर आमिर खान यांचा विवाह आयएएस अधिकारी टीना दाबी हिच्याशी 2018 साली झाला होता. मात्र, त्यांची जोडी फार काळ टिकू शकली नाही. काही दिवसानंतर त्यांनी पुन्हा एकमेकांशी घटस्फोटही घेतला आहे.

Leave a Comment