हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज आंतरराष्ट्रीय धावपटू हिमा दास याना पोलिस उप अधीक्षक या पदाचे नियुक्तीचे औपचारिक पत्र दिले. राज्याच्या ‘एकात्मिक क्रीडा धोरण’ अंतर्गत दास यांना डीएसपी पदावर नियुक्त करण्यात आले आहे. आज त्यांना सरूसझाई क्रीडा संकुलात नियुक्ती पत्र देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आसाम पोलिसात नव्याने भरती झालेल्या 7 उपनिरीक्षकांनाही नियुक्तीपत्रे दिली.
मुख्यमंत्री सोनोवाल म्हणाले, हिमादास यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे राज्याचा गौरव झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्प्रिन्टर हिमा दास यांना आसाम पोलिसात पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्त केले आहे
दरम्यान यावेळी हिमा दास म्हणाल्या, “मला शालेय काळापासूनच पोलिस अधिकारी व्हायचे होते. माझ्या आईचेही असेच स्वप्न होते. दुर्गापूजनाच्या वेळी ती नेहमीच मला आशीर्वाद द्यायची. आईने मला आसाम पोलिसात सेवेत घ्यावे अशी इच्छा होती. मला सर्व काही खेळामुळे मिळालं आहे असेही त्या म्हणाल्या.
आसामच्या धिंग खेड्यात जन्मलेल्या हिमा आयएएएफ वर्ल्ड अंडर -२० चॅम्पियनशिपच्या ट्रॅक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय अथेलिट आहेत. हिमा याना धिंग एक्स्प्रेस देखील म्हटले जाते. हिमा यांच्या नावावर 400 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’