औरंगाबाद रेल्वेस्थानक बनले गुन्हेगारांचे नंदनवन; गेल्या वर्षभरात अडीच हजार चोरींचे गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसर आणि येथे थांबणाऱ्या रेल्वे म्हणजे गुन्हेगारांचे नंदनवन बनले आहे. वर्षभरात लोहमार्ग पोलिसांनी विविध प्रकरणी 2 हजार 463 केसेस केल्या असून, 12 लाख 74 हजार दंड वसूल केलाय, तसेच चोरट्यांनी रेल्वेतून तब्बल 50 लाखांचे सोने लांबवल्याचे समोर आले आहे.

लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या वतीने रेल्वेमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर सातत्याने कारवाईची मोहीम राबवण्यात येते. चोरट्यांनी वर्षभरात रेल्वेमध्ये धुमाकूळ घातला आहे. प्रवाशांच्या बॅग, चैन आणि सोने चोरीस जाण्याच्या अनेक घटना यामध्ये घडल्या आहेत. रेल्वेमध्ये दरवाज्यात बसलेल्या प्रवाशांच्या हातावर काठी मारीत मोबाइल पळवण्याचे तब्बल 184 प्रकार यावर्षी घडले आहेत. यामध्ये 22 गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच वर्षभरात रेल्वे आणि प्लॅटफॉर्मवर मिळून एकूण 50 लाख 93 हजारांचे सोने चोरीला गेले.

यापैकी सव्वातीन लाखांचा ऐवज चोरट्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तसेच लोहमार्ग कायद्यानुसार पोलिसांनी तब्बल दोन हजार 463 जणांवर कारवाई केली. यामध्ये त्यांच्याकडून पावणेतेरा लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये विनातिकीट प्रवास करणे, विनापरवानगी खाद्य पदार्थ विक्री करणे, रेल्वेत गोंधळ घालणे, नो पार्कींगमध्ये वाहने उभी करणे आदी कलमांचा समावेश आहे.