ATM Card Insurance : ATM कार्डवर मिळतो लाखो रुपयांचा मोफत विमा; पहा कसा मिळेल लाभ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ATM Card Insurance) तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल तरी तुम्हाला ATM कार्डची सुविधा मिळते. आजच्या काळात ATM कार्ड माहित नाही किंवा वापरत असे कुणी क्वचितच असेल. पाकिटात कॅश नसेल तर अशावेळी ATM मशीनचा वापर करून आपण सहज कॅश मिळवू शकतो. त्यामुळे बरेच लोक ATM चा वापर करतात. मात्र, हे एटीएम कार्ड ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले गेल्यास तुम्हाला मोफत विम्याची सुविधा मिळते याबाबत तुम्हाला माहित आहे का?

प्रधानमंत्री जन धन योजना आणि रुपे कार्डमुळे एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, रोख रकमेवरील अवलंबित्व कमी झाले. शिवाय व्यवहारदेखील काही अंशी सोपे झाले. (ATM Card Insurance) मात्र, याशिवाय ATM चे इतर काही फायदे आहेत. ज्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. या माहितीअभावी बरेच लोक ATM तर्फे मिळणाऱ्या सुविधांना मुकतात. जसे की, ATM कार्डधारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू विमा (जीवन विमा) मिळतो. डेबिट/एटीएम कार्डवर लाइफ इन्शुरन्स कवच मिळते. ज्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

ATM कार्डधारकांना मिळतो मोफत विमा (ATM Card Insurance)

तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे ATM असेल आणि त्याचा वापर ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तुम्ही मोफत विमा सुविधेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा अशा दोन विमांचा समावेश आहे. तुमच्या ATM कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. (ATM Card Insurance) ती अशी की, SBI त्याच्या गोल्ड ATM कार्ड धारकांना ४ लाख रुपये (हवाई मृत्यू),२ लाख रुपये (नॉन एअर) कवच प्रदान करते. तर, प्रीमियम कार्ड धारकांना १० लाख रुपये (हवाई मृत्यू), ५ लाख रुपये (नॉन-एअर) कवच प्रदान करते.

तर HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँकेसह आणि काही बँका त्यांच्या डेबिट कार्डवर ग्राहकांना विविध रकमेचे कवच प्रदान करते. यांपैकी काही बँकांचे डेबिट कार्ड ग्राहकांना ३ कोटी रुपयांपर्यंतचा मोफत अपघाती विमा कवच प्रदान करतात. (ATM Card Insurance) मुख्य बाब अशी की, ग्राहकांना दिले जाणारे हे विमा संरक्षण मोफत प्रदान केले जाते. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात नाहीत किंवा कोणतेही शुल्क देक्झिल आकारले जात नाही.

डेबिट कार्ड व्यवहार

ग्राहकांना मोफत विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी त्यांचे डेबिट कार्ड व्यवहार अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात. कारण, डेबिट कार्डद्वारे ठराविक कालावधीत काही व्यवहार केले जातात. जे वेगवेगळ्या कार्डांसाठी विम्याचा लाभ देणारा कालावधी बदलू शकतात. (ATM Card Insurance) तर काही एटीएम कार्डांवर विमा पॉलिसी सक्रिय करायला ग्राहकांना किमान ३० दिवसात एकतरी व्यवहार करणे अनिवार्य आहे. तर काही ग्राहकांना विमा संरक्षण सक्रिय करायचे असल्यास शेवटच्या ९० दिवसांत किमान एक व्यवहार करणे अनिवार्य आहे.