हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल पैसे काढण्यासाठी बँकेत न जाता आपण थेट ATM मध्ये जातो. देशभरात टप्प्याटप्प्यावर ATM मशीन उपलब्ध असल्याने बँकेत जाण्याची आणि रांगेत उभं राहण्याची कटकट मिटली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सतत एटीएमचा वापर करतच असाल हे नक्की… मात्र आता ATM मधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी निराशाजनक बातमी आहे. कारण येत्या काही दिवसांत तुम्हाला दुसऱ्या बँकेतील ATM मधून पैसे काढणे (ATM Cash Withdrawal Charges) थोडे महाग पडू शकते. देशातील एटीएम ऑपरेटर रोख पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणारे इंटरचेंज शुल्क वाढवण्याची मागणी करत आहेत.
का होत आहे मागणी ? ATM Cash Withdrawal Charges
तस बघितलं तर एटीएमधारक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात, परंतु देशातील वेगवेगळ्या बँकांनी इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून मोफत व्यवहार करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. एका रिपोर्टनुसार, कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री 17 ते 23 रुपयांदरम्यान इंटरचेंज फीची मागणी करत आहे. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाकडे एटीएम उद्योग संघटनेची ही मागणी आहे. या वाढीमुळे व्यवसायास करण्यासाठी अधिक निधी मिळण्यास मदत मिळेल. मात्र, याबाबत आरबीआयकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. एटीएम इंटरचेंज हे असे शुल्क आहे जे कार्ड जारी करणाऱ्या बँकेद्वारे बँकेला दिले जाते जिथे कार्ड रोख काढण्यासाठी (ATM Cash Withdrawal Charges) वापरले जाते.
एटीएम इंटरचेंज चार्ज हे मेट्रो शहरांमध्ये 3 नॉन-बँक एटीएम विथड्रॉल्सवर आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 नॉन-बँक एटीएम विथड्रॉवलवर आकारले जाते. सध्या, बचत खातेधारकांसाठी एका महिन्यात किमान पाच व्यवहार विनामूल्य आहेत. त्याच वेळी, काही बँका आहेत ज्यांचे तीन एटीएम व्यवहार विनामूल्य आहेत. यानंतर वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून विविध प्रकारचे शुल्कही आकारले जाते. 2021 मध्ये हे शुल्क 15 रुपयांवरून 21 रुपये करण्यात आले. त्यातच आता ऑपरेटर्सने या शुल्कात आणखी वाढ करण्याची मागणी झाल्याने येत्या काही दिवसांत इतर कोणत्याही बँकेचे एटीएम वापरण्यासाठी जास्त चार्जेस भरावे लागण्याची शक्यता आहे.