हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ATM Cash Withdrawal) आजच्या काळात कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात. तरीही काही ठिकाणी कॅशचा वापर करावा लागतोच. अशावेळी आपण सर्रास ATM चा वापर करतो. मात्र ATM मधून पैसे काढताना थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. एखाद्या स्कॅमला बळी पडू नये म्हणून सतर्कता महत्वाची. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आपण ज्या मशीनमधून पैसे काढत आहोत ती मशीन सुरक्षित आहे का? याबाबत खात्री करून घेणे फार गरजेचे असते.
आता ती खात्री कशी करून घ्यायची? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल. तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला ATM मशीनचा वापर करण्याआधी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास अनुचित प्रकारांपासून बचाव करता येईल? याविषयी महत्वाची माहिती देणार आहोत.
ATM मशीन वापरण्याआधी ‘या’ गोष्टींकडे जरूर लक्ष द्या
(ATM Cash Withdrawal)
1) ATM मशिन कार्ड स्लॉट
एटीएम मशिनमध्ये असणाऱ्या कार्ड स्लॉटचा वापर करून अनेक हॅकर्स ग्राहकांचा डाटा चोरी करतात आणि त्यानंतर अकाउंट रिकामे करतात. या कार्ड स्लॉटमध्ये एक डिव्हाइस लावला जातो. ज्यामध्ये तुमच्या कार्डची पूर्ण माहिती स्कॅन होते आणि त्यानंतर ब्लूटूथ वा वायरलेस डिव्हाइसमधून डेटा चोरी केला जातो. (ATM Cash Withdrawal) अशा स्कॅमचा शिकार व्हायचे नसेल तर ATM मशीन वापरण्याआधी कार्ड स्लॉटकडे नीट लक्ष द्या. जर तुम्हाला एटीएम कार्ड स्लॉटमध्ये सैल वाटत असेल तर या मशीनचा वापर करू नका.
2) ब्लिंक होणारी लाईट
ATM मशीनचा वापर कारण्यापुरी कार्ड स्लॉटमध्ये कार्ड ठेवताना ब्लिंक होणाऱ्या लाईटकडे नीट बघा. या स्लॉटमध्ये हिरवी लाईट दिसत असेल तर तुम्ही वापरत असलेली ATM मशीन सुरक्षित आहे असे मानता येईल. पण जर या ATM स्लॉटमध्ये ब्लिंक होणारी लाईट लाल रंगाची असेल किंवा यात कोणताही लाईट दिसत नसेल तर या एटीएम मशीनमध्ये गडबड आहे असे समजा. (ATM Cash Withdrawal) अशावेळी कितीही गरज असली तरी या ATM मशीनचा वापर करू नका.
3) ATM कार्डचा पिन नंबर
ATM मशीनच्या वर एक कॅमेरा असतो. ज्यामध्ये मशीनच्या आसपास घडणाऱ्या दृश्यांवर लक्ष ठेवला जातो. मात्र काहीवेळा या कॅमेरासोबत छेडछाड केलेली असते. तुमच्या डेबिट कार्डचा पूर्ण अॅक्सेस मिळवण्यासाठी हॅकरला तुमच्या कार्डचा पिन नंबर गरजेचा असतो. अशावेळी हॅकर्स कॅमेऱ्यासोबत छेडछाड करून त्याचा ऍक्सेस घेतात आणि तुमचा पिन नंबर ट्रॅक करतात. असा प्रकार तुमच्यासोबत घडू नये यासाठी एटीएममध्ये कार्ड वापरताना पिन नंबर टाकतेवेळी दुसऱ्या हाताने नंबर लपवा. ज्यामुळे त्याचा फोटो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जाणार नाही आणि फ्रॉडपासून तुमचा बचाव होईल.
4) ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी
आजकाल ब्लूटूथ किंवा वायरलेस मशिनरीचा वापर करून एखाद्याच्या बँक अकाउंटचा पूर्ण डाटा मिळवला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक हॅकर्स तुमच्या ATM चा पासवर्ड हॅक करतात. यानंतर क्लोनिंग कार्डच्या माध्यमातून तुमचं अकाऊंट रिकामी केलं जात. (ATM Cash Withdrawal) अशावेळी ATM मशीनचा वापर करण्याआधी आजूबाजूला कोणाचे ब्लूटूथ कनेक्शन कार्यरत आहे? ते आधी पहा. स्क्रिनशॉट मध्ये ती माहिती सेव्ह करा. तुमच्याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे लक्षात आले तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. ज्यामुळे पोलिसांना लवकरात लवकर माहिती मिळाल्याने ते फिंगरप्रिंट मिळवू शकतील आणि कारवाई करतील.