ATM PIN : ATM यूजर्ससाठी महत्वाची बातमी!! PIN मध्ये चुकूनही वापरु नका ‘हे’ अंक!

ATM PIN
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल ATM तर तुमच्या सर्वांकडे असेल.. बँकेच्या गर्दीत जाऊन पैसे काढण्यापेक्षा ATM मधून पैसे काढणे सर्वच जण सोयीस्कर मानतात. यामुळे आपला बहुमूल्य वेळ वाचतो. ATM मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्वचा असतो तो म्हणजे ATM PIN.. हा एक ४ अंकी नंबर असतो जो व्यवस्थित टाकला तरच तुमच्या एटीएम मधून पैसे निघत असतात. अशावेळी ATM PIN खूप महत्वाची बाब आहे. आजकाल तर सायबर हल्ल्यांचे आणि हॅकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेकदा तर एटीएम पिन हॅक केल्याच्या आणि बँक खाते रिकामे केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा बघितल्या असतील. अशावेळी आपला एटीएम पिन सुद्धा तितकाच मजबूत असला पाहिजे जेणेकरून कोणताही हॅकर तो हॅक करू शकणार नाही….. चला तर मग आज आम्ही तुम्हाला एटीएम पिन बाबत अशाच काही टिप्स देणार आहोत.

1) नेहमीचेच साधे पिन टाळा

सायबर तज्ज्ञांच्या मते, काही पिन क्रमांक असे आहेत जे अतिशय सोप्पे आहेत आणि अनेक ग्राहक त्याचा सातत्याने वापर करतात. उदाहरणार्थ 1234 हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा आणि सर्वात असुरक्षित पिन आहे.. हा पिन वापरयाला सोप्पा असल्याने अनेकजण हाच पिन एटीएम साठी ठेवण्यावर भर देतात… मात्र इथेच घात होण्याची शक्यता असते. यासोबतच 0000 हा पिन सुद्धा धोकादायक मानला जातो. त्यामुळे असे सोप्पे पिन टाळणे गरजेच आहे.

2) एकच अंक पुन्हा पुन्हा नको (ATM PIN)

कधी कधी आपण डोक्याला ताप नको म्हणून एकच क्रमांक डबल टिबल टाकून पिन तयार करतो. उदाहरणे द्यायची झाल्यास, 1111, 2222, 3333, 4444 किंवा 5555 … परंतु एकाच अंकाची पुनरावृत्ती असलेले पिन कोड सायबर गुन्हेगार प्रथम तपासतात आणि अशा नंबरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. हे पिन सोप्पे असल्याने हॅकरला सुद्धा हॅक करताना जास्त कष्ट घ्यायला लागत नाहीत. त्यामुळे असे पिन त्वरित बदलावेत.

3) अनुक्रमे येणारे क्रमांक टाळा

कधी कधी आपण सोप्यात सोपा पिन टाकण्यासाठी एकसलग नंबर टाकतो.. उदाहरणार्थ, 2345, 4567, 5678, 6789 … परंतु असे एटीएम पिन सायबर गुन्हेगारांना ट्रॅक करणे सोप्पं जाते. त्यामुळे कधीही एकसलग क्रमांक एटीएम पिनसाठी वापरू नयेत.

4) वैयक्तिक माहिती दाखवणारा पिन नकोच

अनेकजण एटीएम पिनसाठी (ATM PIN) आपल्या वाढदिवसाची तारीख किंवा गाडीच्या नंबर प्लेटचा क्रमांक टाकतात… उदाहरणार्थ १९९५…. २००१ … परंतु तुमच्या काही जवळच्या आणि ओळखीच्या लोकांना तुमची हि बातमी माहित असते.. अशावेळी त्यामुळे असे पिन वापरणे धोकादायक ठरू शकते.. त्यामुळे चुकूनही तुमची वैयक्तिक माहिती दर्शवणारा एटीएम पिन टाकू नका.

5) कोणती काळजी घ्याल?

मित्रानो, सायबर हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हॅकरला सुद्धा अडचणीत टाकणारे आणि स्मार्ट एटीएम पिनचा वापर करा. आपल्या एटीएमचा पिन कोणालाही सहज ओळखता न येणारा असावा. आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतागुंतीचा आणि कोणाच्या कधी लक्षातही येणार नाही असे एटीएम पिन ठेवा.
आपले बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहा आणि. जर आपला पिन वरीलपैकी कोणत्याही प्रकारात बसत असेल, तर तो लवकरात लवकर बदलून सुरक्षित पिन सेट करा.