औरंगाबाद । तब्बल 2007 पासून वेळोवेळी अत्याचार केले एकदा दवाखान्यात नेऊन गर्भही पाडला, मात्र पुन्हा युवती गर्भवती राहिल्याने गर्भ पाडण्याची त्याने धमकी दिली. तिने गर्भ पाडला नाही दरम्यान आपल्या विरोधात युतीने पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून त्याने तिच्यासोबत लग्न केले आणि गर्भ पाडण्यास सांगितले मात्र तिने नकार दिल्याने त्याने मारहाण केली.
त्यामुळे युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आशिष भरत गोरे यांच्यासोबत त्याचे वडील भरत गोरे यांसह एका महिलेविरोधात वेदांत्नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. पीडितेच्या तक्रारीनुसार संशयित आशिष याने पीडितेसोबत प्रेम संबंध निर्माण केल.े लग्नाचे आमिष दाखवून 2007 पासून तो वेळोवेळी अत्याचार करत होता. यातून आजवर गर्भ पाडण्याच्या गोळ्या पीडितेला खाऊ घातल्या एक वेळेस दवाखान्यात नेऊन गर्भही पाडला. मात्र पुन्हा गर्भ राहिल्याने तोही पाडण्याची धमकी त्याने दिली.
पीडित मुलीने पोलिसांत तक्रार देऊ नये म्हणून संशयिताने आपल्याला लग्न करायचा आहे असे सांगत विश्वास बसावा म्हणून तिला विवाहनोंदणी कार्यालयात घेऊन गेला. तिथे त्यांनी लग्नही केले लग्न झाल्यानंतर गर्भ पडण्यास सुरुवात करत होती मात्र संशयित आता मी तुझ्याशी लग्न केले आता माझ्या विरोधात तक्रार देता येणार नाही असे म्हणून तिला वागविण्याचे त्याने आश्वासन दिल.े मात्र त्यांनी पुढे तिला घरी नेले नाही लग्न केल्यानंतर तिला शिवीगाळ मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली तसेच संशयित आशिषच्या आई-वडिलांनीही पुढे त्याला शिवीगाळ केल्यामुळे तिच्या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.