सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
माण- खटावचे भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्ताऐवज (Land Document) केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला असल्याची माहीती दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहीवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध दहिवडी पोलिसांत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीचा दस्ताऐवज केला असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आज सकाळी महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिवडी पोलीस स्टेशन येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, दत्तात्रय घुटुगडे, महेश बोराटे यांच्यासह इतर दोन इसमाविरूध्द कलम 3-1 जी, भारतीय दंड विधान 420, 417, 467,468 आणि 471 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.