दहशतवादी कट : मुंबईतून सातवा संशयित पोलिसांच्या ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रा एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत शुक्रवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी येथून एकाला ताब्यात घेण्यात आलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते.

मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दिल्लीच्या स्पेशल सेलने जानची चौकशी केली, त्यानंतर महाराष्ट्र एटीएसला याची माहिती देण्यात आली होती. त्याला त्याच्या घरातूनच उचलण्यात आले.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेमोठ्या दहशतवादी  कटाचा उलगडा केला. सणासुदीच्या काळात हे  दहशतवादी  भारतात हल्ला करणार होते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी 14 सप्टेंबरला सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे

You might also like