धक्कादायक ! शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृणपणे हत्या

जबलपूर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी शेतात काम करणाऱ्या एकट्या शेतकऱ्यावर सशस्त्र हल्ला केला. हे हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी शेतकऱ्याचा गळा चिरून त्याचे मुंडकेसुद्धा गायब केले आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. हि धक्कदायक घटना मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्याच्या तिलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसिया गावामध्ये घडली आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव गया प्रसाद असं आहे. मृत गया प्रसाद सोमवारी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात कामाला गेले होते. सोमवारी दुपारी शेतात काम करत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला आणि या हल्यात त्यांचा मृत्यू झाला. हे हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मृत गया प्रसादचा गळा कापून त्याचं मुंडकं पळवलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तिलवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मृत गया प्रसाद याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केली. हि हत्या नेमकी कोणत्या कारणावरून करण्यात आली हे अजून समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हि हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.