धक्कादायक ! जॉगिंगला गेलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सांगलीतील उपजिल्हाधिकारी (Deputy Collector Harshalata Gedam) महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हर्षलता गेडाम असे या महिला जिल्हा अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या सकाळी जॉगिंगला जात असताना त्यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला केला आहे. या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके ?
हर्षलता गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. त्यावेळी जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडण्याचा प्रयत्न केला. उपजिल्हाधिकारी (Deputy Collector Harshalata Gedam) यांच्यासमोर गलिच्छ भाषेचा वापर केला. त्यानंतर हात लावणाऱ्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. यानंतर झालेल्या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात उपजिल्हाधिकारी (Deputy Collector Harshalata Gedam) हर्षलता गेडाम यांच्या हातावर किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या दोन आरोपींपैकी एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आज तिच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला. यानंतर उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी???

रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Leave a Comment