शुल्लक कारणावरून तरुणावर तलवारीने वार

0
66
Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जायकवाडी : वाहेगाव ता. पैठण येथे क्षुल्लक कारणावरून तलवारीने वार करीत एका व्यक्तीला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पैठण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ शहारुख बागवान वय 28 ( रा. वाहेगाव ता. पैठण ) याने रात्री दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरासमोर झोपण्यासाठी पलंग टाकला होता. तो पाहून आरोपी संतोष गटकळ ( रा. वाहेगाव. ता. पैठण ) याने पलंग रस्त्यावर का टाकला म्हणून पलंग रस्त्याच्या बाजूला फेकून दिला व शिवीगाळ करून छातीवर, डाव्या हातावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.

याबाबत एमआयडीसी पैठण पोलिसांना माहिती मिळाली असता ग्रामस्थांनी व पोलिसांनी गंभीर जखमी शाहरूख बागवान औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून शाहरुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याप्रकरणी फिर्यादी बागवान यांच्या फिर्यादीवरून आरोपी गटकळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार राजू जावळे, खंडू मंचरे, विजय मोरे, मोहतमल, राहुल बचके, तुकाराम मारकळ, संजय जाधव शरद पवार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here