हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या १३ शेतकऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा आणि दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हरियाणाच्या अंबालामध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या एका गटानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते.

आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभांना संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री खट्टर अंबालामध्ये आले होते. अंबालाच्या अग्रसेन चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवले होते. याशिवाय, सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. त्यातील काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर लाठ्या फेकल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

“शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करुन हरियाणा सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणारं सरकार किती निराशेच्या गर्तेत बुडालंय हे दिसून येतं”, असं कुमारी सेजला म्हणाल्या. भाजप सरकारकडून वारंवार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. “भाजप सरकारवरने जनतेचा विश्वास गमावला आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून झाला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री खट्टर यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत”, अशी टीका कुमारी सेजला यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment