सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा येथील पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी सामूहिक आत्मदहनाचा केला प्रयत्न केला. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी ही कंपनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा यावेळी कामगारांनी आरोप केला.
आज दि. 2 फेब्रुवारी रोजी 20 ते 22 लोकांनी एकत्र येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आमच्या संसाराची राखरांगोळी केली, असे म्हणत कामगारांनी ज्वलनशील पदार्थ अोतून आपल्या अंगावर ओतून घेतला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
सदरची कंपनी सातारा एमआयडीसीत आहे. कामगारांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आत्मदहनाचे पाऊल कामगारांनी उचलल्याने कंपनीच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांना शांत केले.