अयशस्वी : शेणोलीत महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील शेणोली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. शनिवारी दि. 29 रोजी पहाटे ही घटना निदर्शनास आली. तालुक्यातील आजही शेणोली बॅंकेवर गेल्या दोन वर्षापूर्वी दिवसा पडलेला दरोडा आजही लोकांच्या लक्षात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कराड शहरापासून काही अंतरावर असेलली शेणोली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये 2019 मध्ये धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. तो दरोडा काही दिवसात पोलिसांनी उघडकीस आणला होता. त्यात आज दि. 29 रोजी शनिवारी पहाटे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, कराड ग्रामीण पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.

Leave a Comment