पुण्यातील वैशाली हॉटेल बंदुकीच्या धाकावर बळकावण्याचा प्रयत्न; हॉटेल मालकाच्या मुलीचा पतीवरच गंभीर आरोप

hotel vaishali pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

Vaishali Hotel, Pune News, Crime News, Pune News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यामधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एफसी रोडवरील प्रसिद्ध असलेले हॉटेल वैशाली (Hotel Vaishali) बंदुकीच्या धाकावर बळकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत हॉटेल मालकाच्या मुलीचे आपल्या पतीविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. आपल्या पतीनेच बंदुकीचा धाक दाखवून पॉवर ऑफ अटॉर्नी करून हॉटेल स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे सदर महिलेने म्हंटल आहे. या प्रकरणी विश्वजीत विनायकराव जाधव (वय 38), अभिजित विनायकराव जाधव (वय 40), विनायकराव जाधव (वय 65), वैशाली विनायकराव जाधव (वय 60) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पीडित फिर्यादीला 2018 मध्ये घोले रोड येथील राहत्या घरी नेले. या ठिकाणी तिला दारु व ड्रग्ज देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. येव्हडच नव्हे तर पिस्तुलचा धाक दाखवून महिलेकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ अॅटर्नी आपल्या नावावर करुन महिलेच्या वडिलांचे हॉटेल स्वतःच्या नावावर करुन घेतले.तसेच तक्रारदार महिलेच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या परस्पर विकल्या असून एक कोटी 70 लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जावरून शिवाजी नगर पोलिस स्टेशन मध्ये तिचा पती, दिर आणि सासू -सासऱ्यांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विक्रम गौड अधिक तपास करीत आहेत. परंतु ज्या सांस्कृतिक वारश्यासाठी पुणे शहर ओळखलं जात त्याच पुण्यात अशा प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.