प्रियकराच्या मदतीने रचला होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट यवतमाळमधील घटना

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ मध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शीतपेयातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची कबुली भावी पत्नीनेच दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली आहे. हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण
नेर तालुक्यातील कोहळा येथील किशोर परशराम राठोड या तरुणाचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील जांभुळणी येथील एका तरुणीबरोबर ठरला होता. त्याचे लग्न १९ एप्रिलला ठरले होते. पण या तरुणीचे बाहेर एका तरुणाबरोबर प्रेम प्रकरण होते. तरुणीला त्या तरुणाबरोबर लग्न करून आपला संसार थाटायचा होता. पण कुटुंबाच्या शब्दाबाहेर जाता येत नाही म्हणून तिने या लग्नाला होकार दिला होता. परंतु हे लग्न मोडण्यासाठी तिने आणि तिच्या प्रियकराने एक प्लॅन केला.

या प्लॅननुसार खरेदी करण्याचा बहाण्याने होणाऱ्या नवरदेवाला नेर येथे बोलावण्यात आले. त्यानंतर ती तरुणी दोन भाऊ आणि बहिणीसोबत नेर येथे आली होती. त्यानंतर त्या तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला एका ज्यूस सेंटरमध्ये नेले. त्यानंतर तिने होणाऱ्या नवऱ्याला शीतपेय पिण्याचा आग्रह केला. होणाऱ्या बायकोच्या आग्रहाखातर तरुणाने शीतपेय पिले. त्यानंतर तरुणी आपल्या बहीण-भावासह निघून गेली व त्या तरुणीचा होणरा नवरासुद्धा निघून गेला. मात्र काही वेळाने त्याला मळमळ होऊ लागली आणि तो खाली पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. किशोर यामधून बरा झाला आहे. त्यानंतर त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तरुणी आणि तिच्या दोन भावांना ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा उलघडा झाला. यानंतर पोलिसांनी नववधू तिचे २ भाऊ आणि बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे.

You might also like