मित्राकडून हत्येचा प्रयत्न; पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण थेट पोलीस ठाण्यात पोहोचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एक तरुण पोटात लागलेला चाकू घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

यामध्ये एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करत असताना तरुणाच्या पोटात चाकू अडकून राहिला. आणि तो तरुण तसाच चाकू घेऊन थेट पोलीस ठाण्यात गेला.

या जखमी तरुणाचे नाव विनय राबा असे आहे. मित्रांसोबतच्या जुन्या वादातून हि घटना घडली आहे. या घटनेत आणखी दोन मित्र जखमी झाले आहेत. विनयच्या पोटात चाकू घुपसल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या तरुणाच्या डोक्यालादेखील मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे.

Leave a Comment