हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन मुंबई येथे सुरु असून आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान अधिवेशन आता सुरु असतानाच विधीभवनाच्या बाहेर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयात्न केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती व्यावास्थित पद्धतीने हाताळल्याने परिस्थती नियंत्रणात आली
सदर महिला ही नाशिकची असल्याची प्राथमिक माहिती आहे ती महिला नाशिकहून मुंबईला आली होती. तिने तेथील पोलीस आयुक्तांवर काही गंभीर आरोप करत आत्मदहनाचा प्रयात्न केला. यानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या महिलेला ताब्यात घेतलं
पोलिसांनी गुन्हेगारांना अभय दिले आहे आणि आमच्या कुटुंबावर जाणूनबुजून गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप त्या महिलेने केले. मला सोडा, जाऊ द्या. मी इथे न्याय मागण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला सहकार्य करते, मला प्रसारमाध्यमांशी बोलून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं