कराडात पतसंस्थेच्या ठेवीदार, सभासदांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांकडून तिघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते नागरी पतसंस्थेने ठेवीदारांची ठेवीची मुदत संपलेली असतानाही गेली चार- पाच वर्षे पैसे ठेवीदारांना दिलेले नाहीत. त्यामुळे डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या मोहिते हॉस्पिटल समोर आज सकाळी यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेविदारांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करणाऱ्या बबनराव पाटील (आटके), शंभूराज पाटील (काले), दीपक पावणे (कासार शिरंबे) या आत्मदहन करणार्‍या तिघांना ताब्यात घेतले.

यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात गेली काही दिवस विविध संघटनांच्या वतीने सभासद ठेवीदारांनी आपले पैसे परत मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.

तसेच संबंधित प्रशासनाला निवेदन ही देऊन आपल्या ठेवींची मागणी केली होती. मात्र, तरीही अद्याप ठेवीदार सभासदांना त्यांचे पैसे परत न मिळाल्याने अखेर आज या संस्थेच्या काही सभासद ठेवीदारांनी कराड येथील मोहिते हॉस्पिटल समोर अंगावर ज्वलनाशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ या तिघांना रोखून ताब्यात घेतले.