सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर बाजारपेठेपासून नजीक नगरपरिषद शाळा क्र ०१ च्या पाठीमागील बाजूस राहणाऱ्या घोडे व्यवसायिक राजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव रा. स्कुल मोहल्ला याने पत्नी बायना राजेंद्र जाधव हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
घटनेननंतर या परिसरात गर्दी जमली या गर्दीचा फायदा घेत महिलेचा पती राजेंद्र उर्फ राजू जाधव यांनी पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर महाबळेश्वर- पाचगणी परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या दुर्दैवी घटनेत बायना जाधव गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांच्या मुलाने त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात महाबळेश्वर येथे नेण्यात आले.