नांदेड : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर पतीने पत्नीचा गळा पकडून सॅनिटायझर पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात पडितेच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमधील रहिवासी असलेल्या सौ.पायलकौर ऊर्फ जसप्रीतकौर हिचा विवाह निजामाबादच्या गाजुलपेठ बुरुडगल्लीतील रहिवासी गुरनामसिंध जमदार याच्यासोबत झाला होता. २२ मे रोजी निजामाबादमधील घरी गुरनाम आणि त्याची पत्नी पायलकौर यांचे भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून गुरनामने २२ मे रोजी सकाळी १० वाजता तिचा गळा आवळून म्हणाला ‘तुला आता जिवंत मारतो’ म्हणून तोडांत सॅनिटायझर ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत बेशुद्ध झालेल्या पायलकौर हिला उपचारासाठी नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेव्हापासून पायलकौर बेशुद्ध होती. नुकतीच ती शुद्धीवर आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तीचा जवाब नोंदवला त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पती गुरनामसिंघ याच्याविरुद्ध गुरनं. १९७/२०२१कलम ३०७, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण निजामाबाद पोलिसांकडे वर्ग सुरू करण्यात आले आहे.